पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा; १०० निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची मागणी

Pm-modi-will-speak-to-nation-omicron-news-update
Pm-modi-will-speak-to-nation-omicron-news-update

नवी दिल्ली : कोरोना काळात मदतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. १०० सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra modi यांना पत्र पाठवलं आहे. पीएम केअर फंडाच्या PM cares fund पारदर्शकतेवर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

एस.सी. बेहर, के. सुजाता राव आणि ए. एस. दुलत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या या पत्रात पीएम केअर फंडाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचं म्हटलं आहे.

मग हे सदस्य कसे?

“पीएम केअर फंड आरटीआय कायदा २००५ च्या नियम २ (एच) नुसार सार्वजनिक प्राधिकरण नाही. जर हे सार्वजनिक प्राधिकरण नाही, तर पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री हे पीएम केअर फंडचे सदस्य कसे आहेत?

त्यांची पदं आणि अधिकारीक स्थान उधारीवर देण्यात आलं आहे का? मंत्री असताना ते विश्वस्त का आहेत?, असा सवाल अधिकाऱ्यांनी या पत्रातून पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

पारदर्शकतेचा अभाव

“पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना राज्यांची सरकारं त्रस्त झाली होती. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि अजूनही आहे,” असंही या अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.

पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा : आईसक्रीम में कोरोना वायरस मिलने से चीन में हड़कंप, तीन सैंपल पॉजिटिव मिले

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं साहित्य खरेदी आणि उपाययोजना राबवण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती मदत कोषाशिवाय स्वतंत्र पीएम केअर फंड निर्माण केला होता.

या फंडात जमा केली जाणारा पैशाला आयकरातून सूट देण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

संसदेतही यावरून बराच गदारोळ झाला होता. आता सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनीच फंडाच्या पारदर्शकतेवर सवाल केले आहेत. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here