कंगनाने दादासाहेब फाळकेंच्या नावामध्ये केला घोळ;नेटकरी म्हणाले अरे नशेडी…

kangana-ranaut-mistake-while-addressing-father-of-indian-cinema-dadasaheb-phalke
kangana-ranaut-mistake-while-addressing-father-of-indian-cinema-dadasaheb-phalke

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त विधानामुळे सध्या चर्चेत आहे. कंगना रणौत ट्विटरवरून शिवसेना, आघाडी सरकारविरूध्द दररोज ट्विट करत आहे. दरम्यान यावेळी एका ट्विटला उत्तर देताना कंगनाकडून मोठी चूक झाली. कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला आहे. यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली.

मनीष अग्रवाल यांनी कंगनावर आरोप करताना तुम्ही सर्वांवर निशाणा साधत पुढची वाटचाल करु इच्छित आहात असं म्हटल होतं. “करण जोहर असो किंवा अन्य कोणी निर्माता. सर्वांच्या मेहनतीने भारतीय चित्रपटृष्टी उभी राहिली आहे. कोणतीही इंडस्ट्री तुमच्याप्रमाणे सर्वांना शिव्या देत १-२ दिवसांत उभी राहत नाही,” असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.

कंगना ट्विटमध्ये म्हणाली

कंगनाने उत्तर देताना दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी उभी केलेली नाही. बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे. त्या जवानाने ज्याने सीमेचं रक्षण केलं, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेची सुरक्षा केली आहे, त्या नागरिकाने ज्याने तिकीट खरेदी करुन दर्शकाची भूमिका निभावली. इंडस्ट्री कोट्यवधी भारतीयांनी उभी केली आहे”.

बाबासाहेब कोण?

त्या पुरस्काराचे नाव काय आहे समजून घ्या

ड्रामा क्विन नाव तरी नीट लिहा

बाबासाहेब की दादासाहेब?

लाज वाटली पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here