Aurangabad : औरंगाबादहून मुंबईसह ‘या’ मार्गांवर बसेस धावणार

औरंगाबादच्या सिडको बसस्थानकावरून रविवारपासून बस फे-यांमध्ये वाढ

Aurangabad-cidco-bus-stand-new-bus-services-will-be-extended-
Aurangabad-cidco-bus-stand-new-bus-services-will-be-extended-

औरंगाबाद : औरंगाबादच्या सिडको बसस्थानकावरून रविवारपासून बसेसच्या फे-या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबईसह, नागपुर,अकोला,यवतमाळ नांदेड या मार्गांवर जाण्यासाठी बसेस सोडल्या जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय आता होणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हे लक्षात घेता एसटी प्रशासनाने बसेस वाढवण्या निर्णय घेतला आहे. 14 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा,पुणे व मुंबईसाठी नव्याने बस सोडण्यात येणार आहे.

सोमवारपासून या बसेस सुटणार

सोमवारपासून सिडको पुणे शिवशाही दररोज पहाटे साडेचार वाजता सुटेल, नागपूर शिवशाही सकाळी साडेसहा, मेहकर साधी जल्द साडेसात, यवतमाळ ११.३०, अकोला पहाटे सहा, ६.४५, ८.१५, ९.००, दुपारी ४.३० शिवशाही, ५.४५, लातूर दुपारी सव्वा वाजता, दोन आणि सव्वाचार वाजता, तुळजापूर सकाळी पावणेनऊ वाजता, सोलापुर पहाटे ५.१५ आणि ६.३० वाजता, नांदेड १ वाजता, ८, १० ४, ५ वाजता, सिडको मुंबई रात्री साडेदहा वाजता सुटेल. नागरिकांसाठी ऑनलाइन रिझर्व्हेशन तिकिट बुकिंगची सुविधा असून प्रवाशांनी त्याचा लाभ घेता येईल.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here