Bihar election 2020 l भाजपामध्ये बंडखोरी, नऊ नेत्यांची हकालपट्टी

बंडखोरांमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली

Bihar ElectionL l Rebellion in BJP, expulsion of nine leaders
Bjp-umang-singhar-digvijaya-singh-jyotiraditya-madhyapradesh-

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी Bihar election 2020 भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपातील नऊ इच्छुक नेत्यांचे पत्ते कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. बंडखोर नेत्यांविरुध्द राष्ट्रीय अध्यक्षांनी कारवाई केली असून बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपानं नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे.Bihar election 2020 नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यात राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप या बंडखोर नेत्यांचा समावेश आहे.

“आपण एनडीए उमेदवारांच्याविरोधात निवडणूक लढवत असून, Bihar election 2020 यामुळे एनडीएसोबतच पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. हे पक्षाच्या शिस्तीविरूद्ध आहे. या कामामुळे तुम्हाला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे,” असं भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी म्हटलं आहे.

वाचा l  …तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

भाजपाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी पक्षातील नेत्यांना इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही उमेदवारी दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. “एनडीएच्या Bihar election 2020 उमेदवारांविरोधात निवडणूक लढवू नये, अन्यथा त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल,” असा इशारा मोदी यांनी दिला होता.

वाचा l Samsung Galaxy A21s स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here