मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक परवानगी, राज्यात बंदी!

मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही

Bombay High Court allows Taziya procession on Muharram in Mumbai
Bombay High Court allows Taziya procession on Muharram in Mumbai

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई व्यतिरीक्त राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे. मोहरम ताजिया मिरवणूक संदर्भात प्रकरणात न्यायालयात पोहोचले होते. त्या संदर्भात न्यायालयानं आज शुक्रवारी (28 ऑगस्ट) रोजी महत्त्वाचा निकाल दिला. (Bombay High Court allows Taziya procession on Muharram in Mumbai )

कोरोनामुळे देशभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकारकडून अनेक धार्मिक सण उत्सवांवरही बंधनं आणण्यात आली आहेत. मुस्लीम समुदायात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात येते. मात्र, करोनामुळे सोशल डिस्टसिंगसह इतर बंधन आणण्यात आल्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही.

त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही भागात मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here