बाळाला बिस्किट खाऊ घातल्याने होणारे नुकसान

side-effects-of-biscuits-on-baby
side-effects-of-biscuits-on-baby

बाळाला ठोस आहार म्हणून बिस्किट खाऊ घातले जाते. बिस्किट हे बाळाला सहज पचतं आणि चवीला सुद्धा चांगलं असतं त्यामुळे बाळ सुद्धा आरामात ते खातं. पण बाळाला बिस्किट खाऊ घालण्याने काही नुकसान ही होतात. त्याबद्दल जाणून घेऊ या.

बिस्किट हे प्रक्रिया करून तयार केले जातात. यामध्ये बीएचए आणि बीएचटी सारखे प्रिजर्वेटिव्‍स असतात. तसेच बेकिंग सोडा आणि ग्‍लाइसेरोल मोनोस्टिरेट ,फलेवरिंग एजेंटचा ही समावेश असतो. यामध्ये रीफाईन्ड गव्हाचे पीठ, ट्रांस फॅट, अॅडिटिव्‍स आणि अन्‍य सिंथेटिक तत्‍व मिसळलेले असतात.

विशेष म्हणजे ठोस आहार आपण जेव्हा बाळासाठी सुरु करतो तेव्हा त्याला बिस्किट खाऊ घालण्याचा पर्याय योग्य नाही. यात असलेले तत्व बाळासाठी धोकादायक असू शकतात असे जाणकारांचे सुद्धा मत आहे. बिस्किटामुळे बाळाला पचन संबंधी समस्या जसे की बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.

बिस्किटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिफाईन्ड साखरेचा वापर केलेला असतो यामुळेच ही बिस्किटे चवीला चांगली असतात. बाळाला जास्त गोड खाण्याची सवय लागू शकते. बिस्कीटाची चव आवडली तर बाळ सतत त्याच बिस्किटाचा हट्ट धरू शकतो. त्यामुळे त्याच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढून अत्यंत कमी वयात त्याला मधुमेह आणि वजन वाढीचा त्रास सुरु होऊ शकतो. म्हणून बाळाला या वयात बिस्किटांपासून दूर ठेवणेच उत्तम आहे. अन्यथा विविध आजार उद्भवण्याचे आपण नाकारू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here