अवघ्या देशावर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चा झेंडा

दिल्लीत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनात विचार मंथन

Brainstorming at National Convention of 'Voice of Media' in Delhi
Brainstorming at National Convention of 'Voice of Media' in Delhi

नवी दिल्ली : देशातील अठ्ठावीस हजार पत्रकार सदस्य असणारी पत्रकारांची संघटना म्हणून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’वर (Voice of Media) शिक्कामोर्तब झाले आहे. याच ‘व्हॉइस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये अगदी थाटात पार पडले. या अधिवेशनामध्ये देशभरामधून सर्व राज्यांचे अध्यक्ष,  पदाधिकारी सहभागी झाले होते. अधिवेशनात ज्येष्ठ समाजसेवक काॅ. भालचंद्र कांगो यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांना शपथ देत या अधिवेशनाची सुरुवात केली. येत्या जूनपासून देशातल्या सर्व राज्यांत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या विचार मंथनासाठी महाअधिवेशनाचे आयोजन केले असल्याची माहिती याच राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिली.

कृतिशील आणि वैचारिक कार्यप्रणालीमुळे अवघ्या दोन वर्षांमध्ये देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि 28 हजार पत्रकारांचे संघटन उभे करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडले. खासदार तथा सामनाचे संपादक संजय राऊत, ज्येष्ठ विचारवंत कॉ. भालचंद्र कांगो, ‘व्हॉइस ऑफ मीडिया महिला संघटनेच्या संघटक सारिका महोत्रा, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, उर्दू विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले , आरोग्य सेलचे प्रमुख भिमेश मुतुला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अधिवेशनाचे उद्घाटन झाले.

देशातल्या प्रत्येक प्रदेशामध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने सुरू केलेल्या कामाचा आढावा प्रत्येक राज्यातल्या प्रदेशाध्यक्षांनी मांडला. देशाच्या सर्व जिल्हा आणि तालुक्यांमध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे जाळे पसरले आहे. या माध्यमातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला जोडल्या गेलेल्या प्रत्येक पत्रकाराच्या सोबत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ एक आवाज बनून पाठीमागे असल्याचेही या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या मनोगतामध्ये भावना व्यक्त केल्या. उद्घाटनप्रसंगी संजय राऊत यांनी पत्रकारितेसाठी सध्या चांगले दिवस नाहीत. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकारांचा आवाज बनून पुढे आला. पत्रकारांचा  आवाज समाजाचा बुलंद आवाज म्हणून पुढे येईल. पत्रकारांसाठी खूप चांगल्या गोष्टी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून घडतायय याचा मला आनंद वाटतो. आपल्या भाषणामध्ये भालचंद्र कांगो यांनी पत्रकारिता समाजासाठी होणे किती आवश्यक आहे असे नमूद केले. आम्हाला पत्रकारांसाठी आणि पत्रकारांच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचेय या भावनेतून आम्ही पुढे आलोय ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने नेमके काय करायचेय, त्याची दिशा काय असेल आणि ते कोणत्या वेळेमध्ये पार पाडायचे हे अगदी स्पष्ट केले आहे. आता मी कामाला लागलोय, या भावनेतून सगळे पदाधिकारी जड अंतकरणाने आपापल्या राज्याकडे निघाली.

सर्व राज्यांतील पत्रकार, वेगवेगळ्या भाषेचे पत्रकार, वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले पत्रकार हे एकत्रित आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतील. काहीतरी विधायक काम करतील याचा अनुभव दिल्लीमध्ये असणाऱ्या अनेक ज्येष्ठ संपादकांनी पहिल्यांदा घेतला. या कामात आम्हीही सगळे सहभागी होऊ, असा विश्वासही अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक संपादकांनी दिला.

नितीन सरकटे यांच्या गाण्याने अंगावर आले शहारे

प्रसिद्ध गायक नितीन सरकटे यांनी आपल्या समूहासह या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. संदेसे आते है, गर्जा महाराष्ट्र माझा, जिंदगी मौत ना बन जाए यारो, हे वतन हे वतन, तेरे मिट्टी मे मिल जावा अशी अनेक एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत अंगावर काटे उभे केले. सरकटे यांनी सादर केलेल्या गाण्यांच्या माध्यमातून एक देशभक्तीपर वातावरण ही या कार्यक्रमांमध्ये तयार झाले होते. महाराष्ट्र सदनमधल्या मुख्य हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पत्रकारितेतल्या अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. दिल्लीमधले अनेक संपादक या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मराठवाड्याचा कलाकार आणि चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अनेक जबरदस्त गाणे देणारा गायक म्हणून नितीन सरकटे यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जून आणि जुलैमध्ये होणार २५ राज्यांत महाअधिवेशन : संदीप काळे

 मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, उडीसा, हरियाना या ठिकाणी होणाऱ्या राज्य महा अधिवेशनाच्या तारखाही निश्चित झाल्या आहेत. उर्वरित असणारा राज्याच्या तारखा दहा मे ला घोषित होणार आहेत. जून आणि जुलैमध्ये देशातल्या २५ राज्यांत महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून देशातल्या त्या त्या राज्यांतल्या संघटनात्मक बांधणीची मोट बांधली जाणार आहे, अशी माहिती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here