राहुल गांधींना पोलिसांकडून मारहाण, कॉलर पकडून जमिनीवर पाडलं

राहुल गांंधी प्रियांका गांधीची अटक आणि सुटका

rahul-gandhi-being-roughed-up-by-uttar-pradesh-police

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गँगरेप पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांचा ताफा रोखला. त्यानंतर, ग्रेटर नोएडा पोलिसांनी धक्का बुक्की केली, कॉलर पकडून मला खाली पाडलं. अशी माहिती राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी दिली. पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर सुटका करण्यात आली. काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. (rahul-gandhi-being-roughed-up-by-uttar-pradesh-police)

rahul gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

वाचा : हाथरसच्या घटनेवरून शिवसेनेनं राष्ट्रपतींकडे केली ही मागणी क्लिक करा

rahul gandhi

 

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

rahul gandhi

राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो”.

राहुल गांधी यांचा योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

rahul gandhi

वाचा : हाथरसची घटना काय आहे वाच सविस्त click करा