Urfi Javed Controversy: चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फीने दाखल केली तक्रार

urfi-javed-controversy-lawyer-filed-complaint-againts-bjp-leader-state-president-mahil-bjp-chitra-wagh-news-update
urfi-javed-controversy-lawyer-filed-complaint-againts-bjp-leader-state-president-mahil-bjp-chitra-wagh-news-update

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उर्फी जावेदवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, उर्फी समोर आली तर थोबडवणार, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. यानंतर आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन सातपुते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उर्फी जावेदवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच, उर्फी समोर आली तर थोबडवणार, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. यानंतर आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन सातपुते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.

“चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केल्याचा मेल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाठवला आहे. लवकरच त्यांची भेट घेऊन याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती त्यांना करणार आहे”, असंही उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितलं.

 काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

“उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार,” अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here