कोरोनाचा हाहाकार! देशात २४ तासांत 1 लाख नवे रुग्ण; ५०० मृत्यू

देशाला कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका

india-corona-update-286384-new-covid19-cases-found-and-573-deaths-in-24-hours-news
india-corona-update-286384-new-covid19-cases-found-and-573-deaths-in-24-hours-news

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचे संकट वाढले आहे. हादरून देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत देशात १ लाख 3 हजार 558 नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. coronavirus-update-india-breaches-1-lakh-3thousand-558-daily-mark-478-deaths-in-the-last-24-hours-news-updates

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२ हजार ८४७ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा: राज्यात आजपासून 30 एप्रिलपर्यंत काय सुरु, काय बंद?, जाणून घ्या संपूर्ण यादी!

देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात कोरोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे.

India reports 1,03,558 new #COVID19 cases, 52,847 discharges, and 478 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry

Total cases: 1,25,89,067
Total recoveries: 1,16,82,136
Active cases: 7,41,830
Death toll: 1,65,101

Total vaccination: 7,91,05,163 pic.twitter.com/Kg4rAhfdgE

— ANI (@ANI) April 5, 2021

सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात

देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात ५७ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित आढळले. २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here