चंद्रकांत पाटील बावचळले आहेत;अजित पवारांची घणाघाती टीका

तरीही एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले

ajit-pawar-slams-bjp-after-historic-win-in-graduate-constituency-election-in-pune-nagpur
ajit-pawar-slams-bjp-after-historic-win-in-graduate-constituency-election-in-pune-nagpur

नांदेड l भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrkant patil हे तर बावचळले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये  अजित पवार आले होते. त्यावेळी ही घणाघाती टीका केली आहे.

भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार पडेल असं म्हणत आहेत. गाजर दाखवण्याचं काम सुरु आहे तरीही एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l Vivo Y1s  स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 7,990 रुपये

महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे एकमेव धोरण आहे. अजित पवार यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत.

माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केलं. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करण्याची आवश्यकता नाही. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here