Shehnaaz Gill l ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचं डब्बू रतनानीसाठी फोटोशूट

व्हाइट शर्ट आणि कलरफुल ट्राउजरमध्ये शहनाज खूपच गॉर्जियस दिसून आली. यात तिने एलिगंट लुक ठेवलाय. या लुकमध्ये तिने ग्रीन कलकरचे हेवी नेकलेस आणि ब्रेसलेट परिधान केलं आहे.

shehnaaz-gill-looks-drop-dead-gorgeous-in-her-latest-photos-update
shehnaaz-gill-looks-drop-dead-gorgeous-in-her-latest-photos-update

पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री शहनाज गिल Shehnaaz Gill लाइमलाइटमध्ये येण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. तिचं नाव नेहमीच ट्विटरवर ट्रेंडमध्ये येत असतं. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉस १३ मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नुकतंच तिने बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्यासाठी फोटोशूट केलंय. शहनाजने या फोटोशूटच्या माध्यमातून डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर शूटमध्ये डेब्यू केलंय.

डब्बू रतनानी यांच्यासाठी केलेल्या या फोटोशूटमुळे शहनाज गिल बरीच चर्चेत आलीय. यापूर्वी तिचा बॉसी लुक फॅन्ससमोर आला होता. त्यानंतर आता शहनाजने कूल लुकमध्ये हे फोटोशूट केलंय. व्हाइट शर्ट आणि कलरफुल ट्राउजरमध्ये शहनाज खूपच गॉर्जियस दिसून आली. यात तिने एलिगंट लुक ठेवलाय. या लुकमध्ये तिने ग्रीन कलकरचे हेवी नेकलेस आणि ब्रेसलेट परिधान केलं आहे. फ्लिक्स हेयरकट सुद्धा अत्यंत साजेसा वाटतो आहे. या फोटोशूटसाठी तिने कॅंडीड पोज सुद्धा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज गिल ही लोकप्रिय पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री आहे. बिग बॉस १३ मध्ये तिचा चुलबुल अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या शोनंतर ती रातोरात स्टार बनली. बिग बॉस १३ मधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये तिचं नाव होतं.

या शोमधून बाहेर पडल्यानंतर शहनाज लागोपाठ फोटोशूट आणि म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत राहिली. बिग बॉस १३ नंतर तिने स्वतःमध्ये बरेच बदल केलेले दिसून आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here