एकनाथ खडसे म्हणाले, अभी कुछ होनेवाला है, असा मेसेज फिरत होता…

एकनाथ खडसेंची ईडी कार्यालयात दोन तासांपासून चौकशी

eknath-khadse-will-appear-before-ed-for-questioning-news-and-update
eknath-khadse-will-appear-before-ed-for-questioning-news-and-update

मुंबई l अंमलबजावणी संचालनालयाने Enforcement directorate पुणे जमीन घोटाळाप्रकरणी Bhosari pune land आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांना चौकशीसाठी बोलावले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर झाले आहे. विशेष म्हणजे एकादिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली होती. आज दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी हे विशेष पीएमएलए न्यायालयाच्या आदेशानंतर 12 जुलैपर्यंत ईडीच्या कस्टडीमध्ये आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चौधरी यांना मनी लॉन्ड्रिंग कायदा (पीएमएलए) अंतर्गत मंगळवारी रात्री अटक केली होती. दरम्यान, चौधरी हे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता.

आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,” असे खडसे यांनी म्हटले.

“मुळात खाजगी व्यवहार असल्याचे याची आधी ५ वेळा चौकशी झाली आहे. आता ५ वर्षानंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली. मला हेतुबद्दल शंका आहे. गेल्या ८ दिवसांपासून जळगामध्ये कुछ होने वाला हे असा मेसेज फिरत आहे याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतुने हे सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,” असे खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर चौकशी सुरू झाली आहे, असा आरोप केला. “या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे. जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे”, असे खडसे म्हणाले. 

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

खरेदीमुळे शासनाला 61 कोटींचा फटका
पुणे जिल्ह्यात भोसरी तालुक्यातील हवेली गावातील एमआयडीचा सर्व्हे. 52-2ए-2 हा भूखंड बाजारभावापेक्षा स्वस्तात खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चाैधरी यांच्याविरोधात सन 2017 मध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) खात्याने गुन्हा दाखल केला होता. या खरेदीमुळे शासनाचे 61 कोटी 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

31 कोटी बाजारमूल्य, 3.75 कोटीने खरेदी
अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडाचे बाजारमूल्य 31 कोटी रुपये असताना त्याची 3 कोटी 75 लाख रुपयांची रजिस्ट्री झाली होती. गिरीश चाैधरी यांनी इतरांच्या साथीने हा एमअायडीचा भूखंड प्रत्यक्ष किमतीपेक्षा अडीच ते तीनपट स्वस्तात खरेदी केला. ही खरेदी करण्यासाठी चाैधरी यांनी काही कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचे दाखवले. प्रत्यक्षात या कंपन्याच अस्तित्वात नव्हत्या अथवा शासकीय दप्तरात त्या बंद पडल्याची नोंद होती.

हेही वाचा

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

Petrol Diesel Price Today l इंधनाचा भडका! 109 रुपये लीटरवर पोहोचले पेट्रोलचे दर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here