‘स्वीट कपल’ नवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’

nawab-malik-alleged-sameer-wankhede-nikah-sabana-qureshi-cruise-drug-case-news-update
nawab-malik-alleged-sameer-wankhede-nikah-sabana-qureshi-cruise-drug-case-news-update

मुंबई: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्याने मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर नवनवीन आरोप करताना दिसत आहेत. आज  सकाळी नवाब मलिक यांनी ट्विटवर शुभ प्रभात म्हणत समीर वानखेडेंबाबतचा नवा खुलासा केला आहे. मलिकांनी वानखेडे यांचा निकाहनामा ट्वीट करून जारी केला आहे.

 तसेच मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिला लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि म्हटलं आहे की, ‘स्वीट कपल समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) आणि डॉ. शबाना कुरेशी (shabana Qureshi)’ दरम्यान या लग्नात ३३ हजार रुपयांची मेहर घेण्यात आल्याचे मलिकांनी सांगितलं आहे.

नवाब मलिकांनी ट्वीटमध्ये नक्की काय म्हटले ?

नवाब मलिकांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘७ डिसेंबर २००६ रोजी गुरुवारी रात्री ८ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचं लग्न पार पडलं. हे लग्न मुंबईतील अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये झालं होत.’

तर मलिकांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘या लग्नात ३३ हजार रुपयांचा मेहर घेण्यात आला होता. यामध्ये २ नंबरचा साक्षीदार अजीज खान होते. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांचे अजीज खान पती आहेत.’ या ट्वीटनंतर नवाब मलिक यांनी स्वीट कपल म्हणत समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाच्या सर्टिफिकेटचा फोटो देखील शेअर केला आहे.

समीर वानखेड़े पर नवाब मलिक का एक और बड़ा आरोप, जारी किया ‘निकाहनामा’

दरम्यान अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज नवाब मलिका काय नवा खुलासा करतात आणि समीर वानखेडेंवर कोणता नवीन आरोप करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here