Petrol Diesel Price Today l इंधनाचा भडका! 109 रुपये प्रति लीटरवर पोहोचले पेट्रोलचे दर

petrol-diesel-price-today-30-april-2022-in-maharashtra-know-new-rates-of-fuel-news-update-today
petrol-diesel-price-today-30-april-2022-in-maharashtra-know-new-rates-of-fuel-news-update-today

नवी दिल्ली l देशभरात वाढत्या पेट्रोल दरांमुळे Petrol Price Today महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशभरात विविध ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर Petrol-Diesel Price Today गगनाला भिडले आहे. राज्यात विशेषत: परभणीकरांना या वाढणार्‍या दरांचा सर्वाधिक फटका बसतो. परभणी जिल्ह्यात आज पेट्रोलचे दर Petrol Price in Parbhani Today 108 रुपये 92 पैशांवर पोहोचले आहेत. या वाढलेल्या दरामुळे नागरिकांना पेट्रोल भरणे ही मुश्कील झाले आहे. परभणीमध्ये आज डिझेलचे दर Diesel Price in Parbhani Today 98.22 रुपये प्रति लीटर आहेत.

परभणीमध्ये इंधन सर्वात महाग का?

परभणी जिल्ह्याला पेट्रोल पुरवठा याआधी मनमाड येथील डेपोमधून केला जात होता. परंतु त्या ठिकाणचं अंतर 620 ते 630 किलोमीटर पडत असल्याने आता परभणीला सोलापूर डेपोशी जोडण्यात आले. परंतु त्या ठिकाणचंही अंतर जवळपास 580 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होण्यावर त्याचा विशेष परिणाम झाला नाही. परिणाम स्वरूप परभणी जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचे रेट हे सर्वाधिक असतात. पेट्रोल पंप चालक विनय बांठीया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. या 11 राज्यांच्या यादीमध्ये राजस्‍थान, बिहार, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगणा, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू आणि कश्‍मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि लडाख आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळत आहे. 4 मे पासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 15 टक्के वाढ झाली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

आज देशातील विविध शहरात पेट्रोलचे दर साधारणातं 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 100.56 रुपये प्रति लीटर तर मुंबईमध्ये 106.59 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात आज 9 पैशांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत दर 89.62 रुपये प्रति लीटर तर मुंबईत दर 97.17 रुपये प्रति लीटर आहेत. इतर शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पुढीलप्रमाणे-

>> चेन्नई – पेट्रोल 101.36 रुपये आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता – पेट्रोल 100.54 रुपये आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लीटर

>> जयपूर – पेट्रोल 107.34 रुपये आणि डिझेल 98.73 रुपये प्रति लीटर

>> लखनऊ -पेट्रोल 97.69 रुपये आणि डिझेल 90.01 रुपये प्रति लीटर

>> पाटणा- पेट्रोल 102.71 रुपये आणि डिझेल 95.02 रुपये प्रति लीटर

>> नोएडा – पेट्रोल 97.80 रुपये आणि डिझेल 90.09 रुपये प्रति लीटर

 दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

हेही वाचा

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here