kalyan Singh l उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

former-uttar-pradesh-chief-minister-kalyan-singh-passes-away-news-update
former-uttar-pradesh-chief-minister-kalyan-singh-passes-away-news-update

लखनऊ l उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह former Uttar Pradesh chief minister kalyan singh यांचे आज (शनिवार) 21 ऑगस्ट रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ मधील एसजीपीजीआयमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.

दोन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थानचे राज्यपाल देखील होते. जेव्हापासून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती.

Former Uttar Pradesh CM and former Rajasthan Governor Kalyan Singh passes away at Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGI) in Lucknow, due to sepsis and multi organ failure: SGPGI

(File photo) pic.twitter.com/lRCv1xHMe2

— ANI UP (@ANINewsUP) August 21, 2021

कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपाचे एक प्रमुख नेते होते.

कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.  २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. तर, २६ ऑगस्ट २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल बनले होते.

१९९९ मध्ये भाजपा सोडल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये पुन्हा भाजपा प्रवेश केला होता. यानंतर ते बुलंदशहर येथून भाजपाचे खासदार बनले, त्यानंतर २००९ मध्ये अपक्ष खासदार देखील बनले होते. २०१० मध्ये कल्याण सिंह यांनी आपली स्वतंत्र जन क्रांती पार्टी तयार केली. उत्तर प्रदेशच्या अतरौली लोकसभा मतदारसंघातून अनेकदा खासदार राहिलेले कल्याण सिंह यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

महागाई, बेरोज़गारी, ग़रीबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते सांगा ?; पटोलेंचा दानवेंना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here