इम्पेरिकल डेटा केंद्राकडे मागितला मग मिरच्या का झोंबल्या? उध्दव ठाकरेंचा विरोधकांना सवाल

thackeray-group-criticizes-chief-minister-shinde-deputy-chief-minister-fadnavis-over-mpsc-students-agitation-news-update
thackeray-group-criticizes-chief-minister-shinde-deputy-chief-minister-fadnavis-over-mpsc-students-agitation-news-update

मुंबई l विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची Maharashtra Assembly Monsoon Session 2021 सांगता झाली आहे. दोन दिवसीय या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. याच दरम्यान भाजपच्या 12 आमदारांचे निलंबनही opposition 12 mla suspended करण्यात आलं. तर दुसऱ्या दिवशी भाजपने आमदारांच्या निलंबनाचा निषेध करत विधानभवन परिसरात निषेध व्यक्त केला. दोन दिवसीय अधिवेशनाचे कामकाज पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी पत्रकार परिषद घेतली.

विरोधकांना जोरदार टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाहीये. मुद्दा काय होता. केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागण्याचा होता. यामध्ये नवीन आम्ही काय केलं. जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केली होती.

राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचं काय आणि एवढ्या मिरच्या जोंबण्याचं कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता.

देवेंद्र फडणवीसांना टोला

अधिवेशनात सोमवारी झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत म्हटलं, कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळीमा फासणार आहे. उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

 मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 

कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळीमा

उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत? देवेंद्र फडणवीस यांना टोला

कालचा गोंधळ शरमेने मान खालींघालायला लावणारा

अधिवेशनात असं घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही

हेही वाचा 

फोन टॅपिंग करायला लावणारा मुख्य सुत्रधार कोण?: नाना पटोलेंचा सवाल

ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला;राऊतांचा भाजपला टोला

…आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात गोमांस विक्री हे ढोंग आहे; शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र

Income Tax Portal l ४,२०० कोटी रुपये पाण्यात, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here