मुंबई l अन्वय नाईक Anvya naik आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी Arnab Goswami सध्या तुरुंगात आहेत. संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज बुधवार (11 नोव्हेबर ) रोजी सुनावणी होणार आहे.
अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका (अपील) दाखल केली असून त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे बुधवारी सुनावणी होणार आहे.
अर्णब गोस्वामी Arnab Goswami यांच्या वतीने वकील निरनिमेश दुबे यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होईल. आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर दोन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अर्णब यांना अंतरिम जामीन देण्यास नकार देऊन त्यांना स्थानिक न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते.
हेही वाचा l Bihar Election Results 2020 l शरद पवार तेजस्वी यादव बद्दल म्हणालेत…
गोस्वामी यांना सध्या तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील अपील याचिकेत केंद्र सरकार, अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अक्षता अन्वय नाईक यांना प्रतिवादी केले आहे.
राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिट दाखल
राज्य सरकारच्या वतीने वकील सचिन पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिट दाखल केले असून गोस्वामी यांच्या याचिकेवर राज्य सरकारचे म्हणणे ऐकल्याशिवाय कुठलाही आदेश पारित करू नये असे त्यात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने गोस्वामी तसेच फिरोझ शेख व नितीश सारडा यांची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळताना म्हटले होते, की आम्ही आमची न्यायकक्षा वापरावी असे यात काही नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी संबंधित सत्र न्यायालयात दाद मागावी. त्यावर सत्र न्यायालय चार दिवसांच्या मुदतीत निकाल देऊ शकेल.
























































































































































