IPL 2020: कोलकात्याचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय!

Kolkata's 'Royal' victory over Rajasthan!
IPL 2020: कोलकात्याचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय! Kolkata's 'Royal' victory over Rajasthan!

IPL2020, RR vs KKR : आयपीएलच्या 2020 सीझन (IPL 2020 Season) मधील 12वी मॅच (12th Match) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या टीम्समध्ये झाली. राजस्थान रॉयल्सच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 137 रन्स करता आल्या यामुळे कोलकाताने 37 रन्सने विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 137 रन्स करता आल्या यामुळे कोलकाताने 37 रन्सने विजय मिळवला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून शिवम मावी, कमलेश नागरकोट्टी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेन, पॅट कमिन्स, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. कोलकाताच्या बॉलर्सने केलेल्या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 137 रन्स करता आल्या. परिणामी कोलकाता नाईट रायडर्सचा विजय झाला.

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले आहे. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असलेली राजस्थान रॉयल्सची टीम आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्सची टीम दुसऱ्या क्रमांकावर दाखल झाली आहे. तर पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सची टीम पोहोचली आहे.

याआधी टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत 174 रन्स केले. यामुळे राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 20 ओव्हर्समध्ये 175 रन्सची आवश्यकता होती.

कोलकाता नाईट रायडर्सकडून शुभमन गिल याने सर्वाधिक म्हणजेच 47 रन्स, ईऑन मॉर्गनने नॉट आऊट 34 रन्स, आंद्रे रसेलने 24 रन्स, नितीश राणाने 22 रन्स, सुनील नरेन याने 15 रन्स केल्या. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरने 4 ओव्हर्समध्ये 18 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. तर, अंकिंत राजपूत, जयदेव उनाडकट, टॉम करन, राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत झालेल्या मॅचेस अटीतटीच्या झाल्या आहेत. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत २१ मॅचेस खेळण्यात आल्या आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट राईडर्स या दोन्ही टीम्सने 10-10 मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. तर एक मॅच रद्द झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here