महात्मा गांधीचा अवमान करणा-या संभाजी भिडेंच्या नांग्या ठेचल्या पाहिजे; आमदार बच्चू कडू संतापले!

बच्चू कडू म्हणतात, “हेच एखाद्या मुसलमानानं म्हटलं असतं तर तुम्ही लगेच पेटून उठले असते. देशद्रोह म्हटलं असतं. त्याला देशाच्या बाहेर काढण्याची भाषा केली असती.”

mla-bachchu-kadu-slams-sambhaji-bhide-mahatma-gandhi-statement-news-update-today
mla-bachchu-kadu-slams-sambhaji-bhide-mahatma-gandhi-statement-news-update-today

मुंबई: शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे जोरदार वाद सुरु झाला आहे.“आपली औकात तपासली पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय आहे? भिडे त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले असतील. त्यांनी एखादी लाठी स्वातंत्र्यासाठी खाल्लेली नाही. पण महात्मा गांधींबद्दल बोलायला ते विसरले नाहीत. त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत”, अशा शब्दांत आमदार बच्चू  कडूंनी Bacchu kadu आपला संताप व्यक्त केला.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानामुळे विधान राजकीय, सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी टीव्ही ९ शी बोलताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी संभाजी भिडेंवर संतप्त शब्दांत हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे?

अमरावतीच्या बडनेरामध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here