”मोदींनाही संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं”, राऊतांच विरोधकांना आवाहन

https://freepressindia.in/maharashtra-shockingt-murder-of-three-members-of-the-same-family-in-aurangabad/
https://freepressindia.in/maharashtra-shockingt-murder-of-three-members-of-the-same-family-in-aurangabad/

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे,अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर पडून काम करावं अशी टीका विरोधकांनी केली होती. त्याला राऊतांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. पंतप्रधान मोदींच्या डिजीटल इंडिया नुसार उध्दव ठाकरे काम करत आहेत. प्रवासात सात सात तास घालण्यापेक्षा एक ठिकाणाहून संपूर्ण काम जर होत असेल तर त्यात काय चूकीचं असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे जबाबदार विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांच्या सूचनांचे सरकार जरुर पालन करेल. त्यांनी योग्य ती माहिती सरकारला द्यावी. त्याचं स्वागतं आहे. असंही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील,नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर घराबाहेर पडत नाही अशी टीका सुरुचं ठेवली आहे. त्याला राऊतांनी आज उत्तर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here