Radhakrushna Restaurant : मुंबईत राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

mumbai-coronavirus-radhakrushna-restaurant-reports-ten-positive-covid19-case- BKC Jumbo Vaccination Centre
mumbai-coronavirus-radhakrushna-restaurant-reports-ten-positive-covid19-case- BKC Jumbo Vaccination Centre

मुंबई: मुंबईतील अंधेरी भागामध्ये राधाकृष्ण रेस्तराँमधील Radhakrushna Restaurant १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये BKC Jumbo Vaccination Centre दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट कायम आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. 

बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. करोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: ”अनुराग, तापसीला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याची किंमत मोजावी लागली”

मुंबई महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट आता २३८ दिवसांवर गेला आहे. अर्थात आज असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी २३८ दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्याचवेळी मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे.

गुरुवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत २४ तासांत ११०३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. एकूण करोनाबाधितांचा आकडा ३ लाख २९ हजार ८४३ झाला आहे. त्यासोबतच २४ तासांत मुंबईत करोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ४८७ झाला आहे. तर ६५४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here