औरंगाबाद: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारविरोधात ”50 खोके महागाई एकदम ओके” असे आगळेवेगळे आंदोलन राज्यभर करण्यात आले. औरंगाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गुरुवारी आज 1 सप्टेंबर रोजी दुपारी क्रांती चौक येथे हे आंदोलन पार पडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी झाले. यावेळी ”50 खोके महागाई एकदम ओके”या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले.
शहराध्यक्ष डॉ. मयुर मोहनराव सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी आयोजन केले होते. यावेळी गुवाहाटी येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेल समोरील झाडे आणि डोंगराचे चित्र काढून देखावा सादर करण्यात आला. बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली. यावेळी शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घो महागाई विरोधात घोषणाबाजी केली.
तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांना फोडण्यात आले होते. आसाम येथील गुवाहाटी येथे गेले होते. तेव्हा ही घोषणा प्रसिद्ध झाली होती. त्याच धाग्याला पकडून आज शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी आमदारावर टीका केली आहे.
या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले…
५० खोके महागाई एकदम ‘OK’
महागाईने दुखते, डोके, गद्दारांना ५० खोके…५० खोके…!
बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार…!
जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी..!
महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी…
हेही वाचा: Abdul Sattar : यह ‘मीठा’ है, वो कडू है, अब्दुल सत्तारांचा बच्चू कडूंना टोला