मुंबई: अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अनुपम श्याम यांचं निधन Anupam Shyam Death झालं आहे. मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि प्रतिज्ञा या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह या दोन गोष्टींमुळे अनुपम यांनी घराघरात ओळख निर्माण केली होती. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते. रविवारी सांयकाळी त्यांचं निधन झालं.
मागील काही दिवसांपासून अनुपम यांच्या प्रकृतीसंदर्भातील बातम्यांमुळे ते चर्चे होते. त्यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी अनुपम यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केले होता. मात्र उपचारांनंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते.
अनुपम श्याम यांचं मल्टीपल आॅर्गन फेल्युअर झालं होतं. सोबतच शुगर पण खूप अधिक होती. त्यांचे शव सकाळी त्यांच्या दिंडोशीतल्या न्यू म्हाडा काॅलनीतल्या निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतर सकाळी 11.30 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
अभिनेता अनुपम श्याम यांनी अनेक टीव्ही आणि चित्रपटात काम केली आहेत. त्यांच्या अनेक भूमिका देखील गाजल्या आहेत. मन की आवाज प्रतिज्ञामधील ठाकुर सज्जन सिंह ही भूमिका चांगली गाजली. प्रतिज्ञा 2 मध्ये पण ते काम करत होते.
अनुपम श्याम यांनी क्योंकि… जीना इसी का नाम है, अमरावती की कथाये, हम ने ली है शपथ आणि डोली अरमानों की सारख्या अन्य लोकप्रिय शो मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्यात. त्यांनी परजानिया, बॅंडिट क्वीन, लगान, दिल से, नायक: द रियल हीरो और ऑस्कर विजेता फिल्म स्लमडॉग मिलियनेयर सारख्या चित्रपटात अभिनय केला आहे