Covid-19 Caller Tune l १०० कोटी डोस पूर्ण होताच कोरोना कॉलर ट्यून बदलली!

covid-19-caller-tune-as-soon-as-the-100-crore-dose-record-was-completed-the-corona-caller-tune-changed-amitabh-bachchan-voice- news-update
covid-19-caller-tune-as-soon-as-the-100-crore-dose-record-was-completed-the-corona-caller-tune-changed-amitabh-bachchan-voice- news-update

नवी दिल्ली: लसीचे १०० कोटी पूर्णकरुन भारतात एक ऐतिहासिक विक्रम नोंदला गेला आहे. त्याच वेळी, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले होणारी कॉलर ट्यून देखील बदलली आहे. आता जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला लसीकरण मोहिमेचा यशस्वी संदेश ऐकायला मिळेल.

जेव्हापासून देशात करोना महामारीने आली, तेव्हापासून मोबाइल फोन वापरकर्त्यांना करोना महामारीबाबत सतर्क करण्यासाठी कॉलर ट्यून ऐकायला जात होती. मात्र, बऱ्याच वेळा लोकांना याचा कंटाळा आला आहे आणि तक्रारही केली आहे. काही लोकांनी कॉलर ट्यून काढण्यासाठी कोर्टात धावही घेतली होती.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजावरून  झाला होता वाद 

अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्या आवाजात करोना महामारीबाबत सतर्क होण्यासाठी जागरूकतेचा संदेश देण्यात आला होता, परंतु गेल्या वर्षापासून बिग बींचा आवाज करोना कॉलर ट्यूनमध्ये ऐकला जात नाही. दिल्ली उच्च न्यायालयात अमिताभचा आवाज काढून टाकण्यासाठी एक याचिकाही दाखल करण्यात आली होती, परंतु यामुळे कॉलर ट्यून बदलला गेला नाही, तर करोना लसीकरणाची नवीन कॉलर ट्यून फोनवर सुरु झाली.

१०० कोटी लसीचे डोस केवळ आकडे नाहीत, हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, खऱ्या कोरोना योद्धाचा आवाज कॉलर ट्यूनमध्ये घेतला पाहिजे, अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांचा आवाज करोना कॉलर ट्यूनमधून काढून टाकला पाहिजे. कारण अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना संक्रमित आहे.अशा परिस्थितीत, त्यांच्या आवाजात जागरूकता संदेश फार प्रभावी होणार नाही.

हेही वाचा- बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत : संजय राऊत

अमिताभ बच्चन कॉलर ट्यूनमध्ये काय संदेश द्यायचे?

कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ बच्चन म्हणायचे, ‘नमस्कार, आपला देश आणि संपूर्ण जग आज कोविड -१९ च्या आव्हानाला सामोरे जात आहे, कोविड -१९ अजून संपलेले नाही, म्हणून सतर्क राहणे आपले कर्तव्य आहे. म्हणून, जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत हलगर्जीपणा नाही. कोरोना टाळण्यासाठी नियमितपणे हात धुणे, मास्क घालणे आणि आपापसात योग्य अंतर राखणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, दोन गजांचे अंतर, मास्क आवश्यक आहे, जर तुम्हाला खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर १०७५ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here