अधिवेशनावर कोरोनाचं संकट; अकरा खासदारांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Modi government's ordeal, controversial agriculture bill in Rajya Sabha today
Modi government's ordeal, controversial agriculture bill in Rajya Sabha today

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या तोंडावर अकरा खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुढील पंधरा दिवस चालणारे अधिवेशन कोरोनाच्या सावटाखाली होईल.  

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक खबरदारीचे घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर सभागृह सदस्यांनाही ७२ तास अगोदर कोरोना चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत अकरा सदस्यांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लोकसभेचे 5 तर राज्यसभेचे 6 खासदारांचा यामध्ये समावेश आहे.

ह्या मुद्दयांवर विरोधकरण्याच प्रयत्न

दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत चाललेला आकडा, घसरलेला जीडीपी, लॉकडाउनमध्ये वाढलेली बेरोजगारी  सर्वसामान्यांना बसलेला फटका, वाढती बेरोजगारी, चीनसोबत चिघळलेला सीमावाद  चीनकडून झालेली घुसखोरी यासह अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत. त्यामुळे विरोधक सरकारला कोडींत पकडतील. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here