Delhi-riots : JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक

umar-khalid-arrested-with-north-east-delhi-riots-connection
विद्मार्थी नेता उमर खालीद याला अटक umar-khalid-arrested-with-north-east-delhi-riots-connection

नवी दिल्ली : दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक करण्यात आली आहे. 

रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आज, सोमवारी खालिदला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं.

उमर खालिद याची चौकशी याआधी ३१ जुलै रोजी चौकशी केली होती. त्यावेळी त्याचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला होता. रविवारी उमर खालिद चौकशीसाठी दुपारी एक वाजता पोहचला होता. ११ तासांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पुढील काही दिवसांत दिल्ली पोलिस उमर खालिदच्या विरोधात चार्जशीट दाखल करु शकते.

दिल्ली पोलिस तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना दे आहेत’

उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केलं आहे. ‘११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना दे आहेत’, असं युनायटेड अटेन्स्ट हेटने म्हटलं आहे.

सीएए आणि एनआरसीविरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणं हे आमचं प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असं युनायटेड अगेन्स्ट हेटने म्हटलंय.

उमर खालिद पीएचडीचा विद्यार्थी


उमर खलिदचा परिवार तीन दशकांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे स्थानिक झाला. उमर खलिद हा झाकिरनगर परिसरात राहायचा. त्याचे वडील हे उर्दु मासिक चालवायचे. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद चर्चेचा विषय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here