Priyanka Gandhi l प्रियांका गांधींचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; म्हणाल्या…

priyanka-gandhis-letter-to-cm-cm-adityanath-10-suggestions-made-news-update
priyanka-gandhis-letter-to-cm-cm-adityanath-10-suggestions-made-news-update

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. राजधानी लखनऊ, प्रयागराज, कानपूर आणि वाराणसी या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून दहा सूचना केल्या आहेत. राज्यातील रूग्णालयांमध्ये निर्माण झालेला ऑक्सिजन व औषध तुटवड्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे, शिवाय कोरोना चाचण्याचे प्रमाण देखील अतिशय कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.priyanka-gandhis-letter-to-cm-cm-adityanath-10-suggestions-made-news-update

प्रियंका गांधी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री योगींना सूचना केल्या असून, यावर विचार केला जावा असा आग्रह केला आहे. तसेच, ग्रामीण भागात तर चाचण्या देखील होत नसून, शहरी भागांमध्ये लोकांना चाचण्या करण्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक दिवसांपर्यंत रिपोर्ट मिळत नाहीत. २३ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्याच्या सरकारकडे केवळ १२६ चाचणी केंद्र आणि ११५ खासगी तपासणी केंद्र आहेत. असं प्रियंका गांधींनी सांगितलं आहे.

याचबरोबर प्रियंका गांधी म्हणतात की, संपूर्ण जगात कोरोनाची ही लढाई चार स्तंभावर टिकून आहे – चाचणी, उपचार, शोध आणि लसीकरण. जर तुम्ही पहिला स्तंभच पाडला तर आपण या जीवघेण्या विषाणूला कसं काय हरवणार?

हेही वाचा: ”मेलेल्या हत्तीवरील अंबारीत मोदी हे माहुताच्या भूमिकेत बसले आहेत”

प्रियंका गांधीनी केल्या या १० सूचना
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी पत्रात लिहिले की, या महामारीला रोखण्यासाठी आम्ही आपल्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील जनतेची शक्य होईल ती सर्व मदत करत आहोत. तुम्हाला तत्काळ कारवाईच्या उद्देशाने काही सल्ले देत आहे. मला अपेक्षा आहे की यावर आपण सकारात्मकतेने विचार कराल.

१. सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइ वर्कर्सच्या हितासाठी एक समर्पित आर्थिक पॅकेजची घोषणा केली जावी.

२.सर्व बंद केलेल्या कोविड रूग्णालयं आणि केअर सेंटर्सना पुन्हा तत्काळ अधिसूचित करावे व युद्धपातळीवर ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता वाढवावी. प्रादेशिक सेवेतून निवृत्त झालेल्या सर्व वैद्यकीयकर्मचारी, मेडिकल व पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळील रूग्णालयांमध्ये काम करण्यासाठी बोलावलं जावं.

३. कोरोना संसर्ग व मृत्यूचे आकडे लपवण्या ऐवजी स्मशान, कब्रस्तान आणि नगरपालिका संस्थांशी चर्चा करून पारदर्शकपणे लोकांना सांगितले जावे.

४. आरटीपीसीआर तपासण्याची संख्या वाढवावी. खात्री करावी की कमीत कमी ८० टक्के तपासण्या आरटीपीसीआरद्वरे होतील. ग्रामीण भागात नवी तपासणी केंद्र सुरू करावीत आणि परेशा चाचणी कीटची खरेदी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह त्यांची मदत करावी.

५. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागात औषध व उपकरणांची कोरोना कीट वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना योग्य वेळी सुरूवातीसच उपचार व औषधं मिळतील आणि रूग्णालयात जाण्याची वेळच येणार नाही. जीवनावश्यक औषधांच्या काळ्याबाजारवर रोख लावावी.

६.ऑक्सिनज साठवण्याचे धोरण त्वरित तयार केले जावे. जेणेकरून आपत्कालीन काळात प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ऑक्सिजनचा राखीव साठा तयार होऊ शकेल. प्रत्येक ऑक्सिजन टँकरला संपूर्ण राज्यभरात रूग्णवाहिकेचा दर्जा दिला जावा, जेणेकरून वाहतूक सुलभ होईल.

७. या संकट काळात निर्बंधांचे घाव सोसणाऱ्या गरीब, मजूर, पथ विक्रेते आणि देशाच्या अन्य राज्यांमधून आपला रोजगार सोडून घरी परतणाऱ्या गरिबांना रोख आर्थिक सहाय्य केलं जावं.

८. राज्यात युद्ध पातळीवर त्वरीत लसीकरणास सुरूवात केली जावी. राज्यातील ६० टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी उत्तर प्रदेशला कमीत कमी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल, तर यासाठी राज्याला केवळ ४० कोटी रुपयांचेच वाटप झाले आहेत. यामुळे मी आपल्याला बुलंदशहरातील भारत इम्युनोलॉजिकल अॅण्ड बायोलॉजिकल कॉर्पोरेशनमध्ये लस निर्मितीची शक्यता पडताळून पागहण्याचा आग्रह करत आहे.

९. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वीणकर, कारागीर, छोटे दुकानदार, छोटे व्यवसाय उद्धवस्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत त्यांना किमान काही दिलासा, जसं वीज, पाणी, स्थानिक कर आदींमध्ये सवलत दिली जावी, जेणेकरून ते स्वतःला सावरू शकतील.

१०. ही सर्वांची मदत घेण्याची, सर्वांना मदत करण्याची, सर्वांचा हात धरण्याची वेळ आहे. या वेळी तुमच्या सरकारने लोकं, पक्ष आणि संस्थांना पुढे येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here