NEET आणि JEE परीक्षा ‘या’दिवशीच होणार

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा निर्णय

jee-and-neet-exams-will-be-held-on-the-dates-announced
jee-and-neet-exams-will-be-held-on-the-dates-announced

नवी दिल्ली :  राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) २०२० ची जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या पूर्वीच्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा केली आहे. आता जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

NTA ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जाहीर करण्यात आलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर NTAने लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना पहिलेच केंद्र देण्याचा ९९ टक्के प्रयत्न करण्यात येईल, असेही NTAने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here