इंजिनिअरिंग व फार्मेसी अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

maharashtra-government-decides-to-reduce-requirement-of-marks-for-admission-in-engineering-and-pharmacology-courses
maharashtra-government-decides-to-reduce-requirement-of-marks-for-admission-in-engineering-and-pharmacology-courses

मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक होते.

आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुणांवर तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुणांवर परीक्षा देण्यासाठी पात्र असतील.  बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे.

वाचा l Rahul Gandhi l ‘देशातील अनेक लोक दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस समजत नाहीत’

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

वाचा l VIDEO आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला,उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना दणका

या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०% असतील आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here