हाथरस प्रकरणावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul gandhi यांनी पुन्हा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की अनेक भारतीय देशातील दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
हाथरसच्या पीडितेवर बलात्कार झालाच नाही, असे मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलिस सांगतात, कारण त्यांच्यासाठी तसेच इतर अनेक भारतीयांसाठी पीडिता ही कोणीच नव्हती, असे राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे.
वाचा l Jaggery benefits l गुळाचे फायदे कोणते जाणून घ्या
बीबीसीच्या एका बातमीवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी वरील उद्गार काढले आहेत. पोलिस आणि राज्य सरकारचे अधिकारी पुन्हा-पुन्हा सामूहिक बलात्कार झालाच नसल्याचे सांगत असल्याचे या बातमीच म्हटले आहे.
याच बातमीवर टिप्पणी करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारची खिल्ली उडवली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘लज्जास्पद गोष्ट ही आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत.
The shameful truth is many Indians don’t consider Dalits, Muslims and Tribals to be human.
The CM & his police say no one was raped because for them, and many other Indians, she was NO ONE.https://t.co/mrDkodbwNC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 11, 2020
मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलिस म्हणतात की, कोणीही बलात्कार केलेला नाही. कारण त्यांच्यासाठी, तसेच इतर अनेक भारतीयांसाठी ती कोणीच नव्हती.’ राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
राहुल गांधी यांनी या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेष विमान खरेदी करण्यावरून टीकास्त्र सोडले होते. आमच्या जवानांना बुलेट प्रूफ नसलेल्या ट्रकमध्ये पाठवले जात आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ८ हजार ४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले गेले आहे, असे सांगत काय हाच न्याय आहे?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
वाचा l WhatsApp new features l नवीन फिचर लगेच करा अपडेट





































































































































[…] […]
[…] […]