महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना, चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले;शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण

Uddhav Thackeray's press conference at 5 pm,
Uddhav Thackeray's press conference at 5 pm,

मुंबई l महाराष्ट्र सरकारविरुद्ध Mahrshtra Government भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले पुरविली जात आहेत. त्यांच्या बेकायदा कृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून हवे ते केले जात असेल, तर इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरुद्ध बोलण्याचा हक्क भाजपा पुढाऱ्यांना नाही. महाराष्ट्राची तसेच मुंबईची बदनामी करणाऱ्यांचे खुले समर्थन या काळात विरोधकांनी करावे हे छत्रपती शिवरायांचे दुर्दैवच म्हणायला हवे,” अशी खंत शिवसेनेनं Shiv Sena व्यक्त केली आहे.

सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार व भाजपाला खडेबोल सुनावले आहे. राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण झालं. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं आरोप होताना दिसले. बरेच राजकीय वादविवादही झडले. या सगळ्या गोष्टींचा समाचार घेताना शिवसेनेनं भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.

 “सत्ता येते आणि जाते, पण राज्य आणि देश टिकायला हवा. माणसे जगली तर राज्य टिकेल. म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून सरकारने माणसे जगविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र विरोधकांनी माणुसकीशून्य राजकारण नव्याने सुरू केले. भारतीय जनता पक्षासारखे लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवीत असतात,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार व भाजपाला खडेबोल सुनावले आहे. “विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. त्यामुळे विरोधकांनी कर्तव्याचे भान ठेवून विधायक कार्याचा मार्ग स्वीकारावा व चार वर्षांनंतर निवडणुकांना सामोरे जावे.

विरोधी पक्ष सरकार खेचण्याचे जे डावपेच आखत आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून राजकारण करणे हे धोकादायक आहे. अशा यंत्रणांचा गैरवापर करून सरकारे पाडणे अथवा बनवणे म्हणजे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले पुरविली जात आहेत.

त्यांच्या बेकायदा कृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून हवे ते केले जात असेल, तर इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरुद्ध बोलण्याचा हक्क भाजपा पुढाऱ्यांना नाही. महाराष्ट्राची तसेच मुंबईची बदनामी करणाऱ्यांचे खुले समर्थन या काळात विरोधकांनी करावे हे छत्रपती शिवरायांचे दुर्दैवच म्हणायला हवे,” अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

हेही वाचा l Bharat Bhalke MLA l राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं कोरोनामुळे निधन

आज विरोधी पक्षांत सर्वमान्य नेता नाही हे खरे, पण गरज पडली व असंतोषाचा भडका उडाला तर त्यातून नेतृत्व आपोआप निर्माण होते असा जगाचा इतिहास सांगतो. आज दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने धडक मारली. ‘सरकार विरुद्ध शेतकरी’ असा भयंकर संघर्ष दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे.

सरकार शेतकऱ्यांना मागे रेटत आहे. त्यासाठी बळाचा वापर बेगुमानपणे चालला आहे, पण हेच ते सरकार लडाखच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना मागे रेटण्यात कमजोर पडले आहे. तिकडे चीनशी चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत, तर दिल्लीत शेतकऱ्यांना तुडवून बाहेर फेकले जातेय. अशा प्रवृत्तीशी लढत महाराष्ट्राला पुढे जायचे आहे.

हेेही वाचा l  Vivo Y1s  स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 7,990 रुपये

राज्याची आर्थिक कोंडी केलीच गेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे. यातून मंत्रालयाच्या पायरीवरून पुढे सरकता येईल, असे विरोधकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. सरकारची वर्षपूर्ती झालीच आहे. अशीच चार वर्षेही पूर्ण होतील. महाराष्ट्राच्या ते हिताचेच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here