India Alliance :‘इंडिया’कडून केंद्रीय समन्वय समितीची घोषणा; ‘या’ नेत्यांचा समावेश, संपूर्ण यादी

jayant-chaudhary-rld-chief-officially-confirms-joining-nda-left-alliance-setback-for-congress-news-marathi-update-today
jayant-chaudhary-rld-chief-officially-confirms-joining-nda-left-alliance-setback-for-congress-news-marathi-update-today

मुंबई: विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची (India Alliance) तिसरी बैठक मुंबई येथे पार पडत आहे. दरम्यान, ‘इंडिया’ने १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थान दिलं आहे. या बैठकीतून ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार होतं. मात्र, लोगो अनावरणाचा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकललं आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीत ‘या’ नेत्यांचा समावेश

के. सी, वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)

शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)

एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)

संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)

तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)

अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)

राघव चढ्ढा (आपचे खासदार)

जावेदअली खान (समाजवादी पक्ष)

लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)

हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)

डी राजा (सीपीआय)

ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)

महेबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here