मुंबई : मुंबई पोलिसांची बदनामी करण्या-या दोन फेक अकाऊंटसवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावेही फेक अकाऊंट सुरू असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. फेसबुकवर हे बनावट खातं असून, प्रोफाईलला मोदींचा फोटो आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटसचा वापर करण्यात आला अशी धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार सुरु असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या नावे सुरू असलेल्या फेक अकाऊंटची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
This is a fake account and is being misused
I m reporting to @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MahaCyber1 @ThaneCityPolice pic.twitter.com/huhyHRysvB— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 6, 2020
जितेंद्र आव्हाड यांच्या नावे फेसबुकवर हे अकाऊंट आहे. जितेंद्र आव्हाड साहेब असं अकाऊंटचं नावं असून प्रोफाईलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू रामचंद्र यांचा फोटो आहे. राम मंदिरही आहे. तर वॉलपेपरला मोदी यांचा जनतेला संबोधित करतानाचा फोटो आहे.
वाचा : ”..जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात”;शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र
जितेंद्र आव्हाड यांनी या फेक अकाऊंटची मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस व महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार केली आहे. फेक अकाऊंट असून, त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. त्यामुळे आपण मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र सायबर सेल, ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामध्ये भाजपच्या आयटीसेलचा,भाजप नेत्यांचा हात असल्याची आरोप महाराष्ट्र विकास आघाडीच्या काही नेत्यांनी केली आहे.
वाचा : ”मोदी सरकारवर ‘नन्नाचा पाढा’ किती वेळा कशा कशा बाबतीत म्हणणार;”शिवसेनेचा सवाल




























































































































































