मुंबई : सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) अटक केली. रियाची आज पाच तास चौकशी करुन तिला अटक करण्यात आली. संध्याकाळी 7:30 वाजता व्हिडियो कॉन्फ्रन्सिंगव्दारे सुनावणी होणार आहे. रियाची चौकशी पूर्ण झाली. तिचा रिमांड घेणार नाही अशी माहिती एनसीबीने दिली. रियाल आज जामीन दिला जाण्याची शक्यता आहे.
रियाच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. रविवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने रिया चक्रवतीच्या घरी जाऊन तिला समन्स बजावला होता. गेल्या तिन दिवसांपासून ड्रग्सप्रकरणी रियाची चौकशी सुरु होती. रियाही सराईत गुन्हेगार नाही. तिचा ड्ग्ज विक्रेत्यांची थेट संबंध नाही. ती तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत आहे. तिची रिमांड घेण्याची गरज नाही अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे तिला आज जामिन दिला जाणार आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो ( NCB) ने सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करत आहे. आतापर्यंत सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद विलात्रा, शोविक चक्रवती (रियाचा भाऊ), सॅम्युअल मिरांडा आणि अब्बास लखानी या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. कॅजन इब्राहिमला देखील अटक केली होती, मात्र शनिवारी त्याला कोर्टातून जामीन मिळाला.
ड्रग्स प्रकरणात दीपेश सरकारी साक्षीदार बनणार आहे. आज त्याच्या साक्षची प्रक्रिया पूर्ण होईल. एनसीबी शोविकला रियासमोर बसून चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एनसीबीने शोविक व मिरांडाला कोर्टात सादर केले. कोर्टाने दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात सोपवले.
अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, दीपेश सावंतला समोरासमोर बसवून शोविक व इतरांच्या चौकशीची गरज आहे. रियाच्या अटकेच्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले, ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. एनसीबीने कैझान इब्राहिमलाही कोर्टापुढे हजर केले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.































































































































































