Shivbhoojan Thali : शिंदे सरकार ‘शिवभोजन थाळी’ करणार बंद!

मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता.

shinde-government-removed-shivbhoojan thali the-grass-from-the-mouth-of-the-poor-news-update-today
shinde-government-removed-shivbhoojan thali the-grass-from-the-mouth-of-the-poor-news-update-today

मुंबई : शिंदे सरकारने (Shinde Government) महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government)  घेतलेले निर्णय, योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी Shivbhoojan Thali बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवभोजन थाळीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून लवकरच हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यातील गोर गरीब लोकांना केवळ 10 रुपयांमध्ये जेवण मिळत होते. कोरोना काळात थाळी केवळ 5 रुपयांना मिळत होती. ही योजना बंद झाली तर चांगलेच राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन शिवभोजन थाळी सुरू केली होती. राज्यात सुमारे 1 लाख 88 हजार 465 थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी राज्यात विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध प्रकारची मदत देखील दिली जाते. मात्र या योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार...लवकरच हा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या योजनेवर शिंदे सरकार नेमकी कोणती भूमीका घेणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवभोजन थाळी ही सर्व सामान्य लोकांना परवडणारी होती. गरजूंना अत्यअल्प दरात भोजन मिळत होते. आपल्याकडे अनेक लोक असे आहेत की. त्यांना दररोज पोटभर जेवण मिळत नाही. मात्र या योजनेमुळे कामगार. रस्त्यांवर विक्री करणारे छोटे विक्रेते, ज्यांना कुटुंब नाही असे लोक. भिकारी. निराधार सगळे जण भोजन करत होते. या योजनेमुळे गरीबांना दिलासा मिळाला होता.

शिवभोजन थाळीत काय असते…राज्यातल्या प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी तसेच तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र उभारण्यात आले होते. हे केंद्र स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचतगट. हॉटेल चालक इत्यादींना चालवण्यास दिले होते. या योजनेसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. या थाळीत एक वाटी भाजी. दोन चपात्या, वरण भात मिळत होते. त्यामुळे गरीबाचे पोट भरत होते. ग्रामीण भागात केंद्र चालवणाऱ्यांना थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील केंद्र चालकांना 35 रुपये अनुदान मिळत होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here