‘’भाजपच्या १२० नेत्यांची यादी ईडीकडे सोपवणार’’; संजय राऊत संतापले

मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात

bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today
bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today

मुंबई l शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी  ED आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

हेही वाचा l ‘’आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू’’;संजय राऊतांचा भाजपला इशारा

या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 “मला अनेकांनी नोटीस आली का विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु असल्याचं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहेत्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

हेही वाचा l मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील;शिवसेनेचा दिल्लीश्वरांना इशारा

मला नोटीस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here