लहान मुलांची हाडे ‘ही’ पोषक तत्वे करतात मजबूत!

kids- strong -bone- tips
kids- strong -bone- tips

आज काल लहान मुलांच्या हाडांच्या (bone disease) आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. याला कारणीभूत आहे पौष्टिक आहाराची कमी! लहान मुलांच्या हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असणारे पोषक तत्वे मुलांना मिळत नाहीत आणि साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या हाडांवर होतो.

बालपणीच मुलांच्या आहारावर लक्ष देऊन त्यांना योग्य प्रमाणात पौष्टिक आहार दिल्यास मोठेपणी त्यांना ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होण्याचा धोका कमी असतो. लहान मुलांना लहानपणीच गंभीर आजार जडतो. यापासून मुलाची रक्षा करायची असेल आणि त्यांच्या हाडांचा विकास योग्य प्रकारे होऊन त्यानी अगदी हसत खेळत आपले बालपण घालवावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मुलाच्या आहाराकडे लक्षण देऊन त्याला असेच पदार्थ खाऊ घालायला हवे ज्यामुळे त्याच्या हाडांना पोषण मिळेल.

कॅल्शियम
हाडांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक हाडांसाठी कॅल्शियम  आहे. 86 टक्के मुलींना पर्याप्त कॅल्शियम मिळत नाही. असं एका निरीक्षणात असे दिसून आले आहे. त्यामुळेच 95 टक्के बोन मास 20 वर्षांच्या वयापर्यंतच तयार होते. म्हणूनच या वयापर्यंत योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळणे अतिशय गरजेचे आहे. चार ते आठ वर्षांच्या मुलांना रोज 1000 मिलीग्राम कॅल्शियम आणि नऊ ते अठरा वर्षांच्या मुलांना 1300 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम मिळाले पाहिजे. ही पूर्तता पूर्ण करण्यासाठी मुलांना दुध व दुधापासून तयार झालेले पदार्थ खाऊ घालावेत.
मुलांची हाडे मजबूत व्हावी म्हणून पालक, केळी, आणि भेंडी यांचा समावेश करणे सुद्धा उपयुक्त ठरते. संत्र्यामध्ये सुद्धा कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. यासाठी मुलाला नाश्त्याला संत्र्याचा ज्यूस द्यावा.
लहान मुलांनी रोज किमान दोन ग्लास तरी दुध प्यायलाच हवे. डेअरी उत्पादन अर्थात चीज, दही यांपासून सुद्धा मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळते.
जीवनसत्त्व ‘ड’
हाडांना मजबूत करण्यासाठी जीवनसत्त्व ‘ड’ ची सुद्धा खूप आवश्यकता असते. जीवनसत्त्व ‘ड’ कॅल्शियम शोषून घेण्यात शरीराला मदत करते. लहान मुलांना आणि त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांना जवळपास 600 इंटरनॅशनल यूनिट (आईयू) ची गरज असते. जीवनसत्त्व ‘ड’ च्या कमतरतेमुळे स्नायुंमध्ये थकवा निर्माण होतो आणि कमजोरी जाणवते.
लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ ची कमतरता निर्माण झाल्यास रीकेटस नावाचा आजार होऊ शकतो. यात हाडे नरम पडून मोडू शकतात. एक ते आठ वर्षांच्या मुलांना दर दिवसाला 2500 ते 3000 आईयु जीवनसत्त्व ‘ड’ आणि 9 पेक्षा जास्त वयाच्या मुलांना 4000 आईयु जीवनसत्त्व ‘ड’ ची गरज असते. ट्युनासारखे मासे आणि अंड्यातील पिवळ्या भागाच्या सेवनाने ही गरज भरून निघते. सकाळचे कोवळे ऊन सुद्धा जीवनसत्त्व ‘ड’ चा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे दिवसातून किमान 10 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.
मॅग्नेशियम
जर मुलाला योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळाले नाही तर पुढे जाऊन त्यांना ऑस्टियोपोरोसिस सुद्धा होऊ शकतो. पालक आणि फुलगोभी मध्ये सुद्धा मॅग्नेशियम आढळते. याशिवाय सोयाबिन मधून सुद्धा मुलाला मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळते. मॅग्नेशियम हा एक खनिज पदार्थ असून बदाम, पालक, काळे वाटाणे, शेंगदाणे, लोणी आणि बटाटे यांत आढळते. त्यामुळे आवर्जून मुलाला या गोष्टी खाऊ घालाव्यात. जर तो खाण्यास कंटाळा करत असेल तर त्याला असे पदार्थ करून खाऊ घालावेत जे त्याला आवडतील.
जीवनसत्त्व ‘क’
जीवनसत्त्व ‘क’ मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास हाडांचा जाडपणा वाढतो आणि यामुळे रिकेटस तसेच ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. जीवनसत्त्व ‘क’ हे कॅल्शियम सोबत मिळून हाडांना मजबूत बनवते. हिरव्या पालेभाज्या जसे की केळी, पालक आणि ब्रोकली याच्यात सर्वाधिक जीवनसत्त्व ‘क’ आढळून येते. या गोष्टी तुम्ही मुलाला जेवढ्या जास्त प्रमाणात द्याल तेवढे त्याच्या शरीरातील जीवनसत्त्व ‘क’ चे प्रमाण वाढेल आणि ते अधिक निरोगी आयुष्य जगेल.
हाडांचे आजार झाल्यास डॉक्टरांकडे घेऊन जा योग्य उपचार करा
जर मुलाला एखादा हाडाचा आजार झाल्यास घाबरू नका उपचार आणि योग्य आहाराने त्यावर सहज मात करता येते. त्याला सर्वप्रथम योग्य डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा. ते एक उपयुक्त डायट प्लान लिहून देतील तो काटेकोरपणे पाळावा.
जर त्यांनी तो दिला नाही तर तो मागून घ्यावा. गोळ्यांमधून मिळणाऱ्या तत्वांपेक्षा आहारातून मिळालेली तत्वे कधीची चांगली! अशामुळे मुल लवकर रिकव्हर होऊन त्याची हाडे पुन्हा मजबूत होतील. मुल बरं झाल्यावरही त्याचं डायट प्लान सुरु ठेवावा. डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन महत्वाचा भाग आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here