Solar Eclipse 2022: 1300 वर्षांनंतर आज सूर्यग्रहण, चार ग्रहांच्या दुर्मिळ योगात सूर्यग्रहण; पाहा सुतक काळ

solar-eclipse-2022-surya-grahan-in-rare-combination-of-four-planets-on-diwali-after-1300-years-news-update today Solar Eclips
solar-eclipse-2022-surya-grahan-in-rare-combination-of-four-planets-on-diwali-after-1300-years-news-update today Solar Eclips

Solar Eclipse 2022: 26 ऑक्टोबरला गोवर्धन पूजा आहे. दरवर्षी गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुस-या  दिवशी होते, परंतु यावेळी तसे होणार नाही. कारण 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी आंशिक सूर्यग्रहण होणार आहे. या दोन सणांमध्ये सूर्यग्रहण आणि बुध, गुरू, शुक्र, शनि आपापल्या राशीत असल्याने गेल्या 1300 वर्षांत असा योग जुळून आलेला नाही. हे ग्रहण भारतातील बहुतांश भागात दिसणार आहे. या कारणास्तव, त्याचे सुतक राहील. सर्व धार्मिक श्रद्धा पाळल्या जातील. दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर सुतक लागण्यापूर्वी लक्ष्मी पूजन साहित्य ठेवून द्यावे किंवा 25 तारखेला ग्रहण संपल्यानंतर काढावे.

यूएस स्पेस एजन्सी नासाच्या वेबसाइटनुसार, 25 ऑक्टोबरचे सूर्यग्रहण युरोप, उत्तर-पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, पश्चिम आशियामध्ये दिसणार आहे. सूर्यग्रहणानंतर 8 नोव्हेंबरला पूर्ण चंद्रग्रहणही होणार आहे. ते आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि अमेरिकेत दिसेल. ते भारतातही पाहता येईल आणि त्याचे सुतकही राहील.

कोलकात्याच्या बिर्ला प्लॅनेटेरियमचे खगोलशास्त्रज्ञ देवी प्रसाद दुआरी यांच्या मते, देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात सूर्यग्रहण सहज दिसेल. हे ग्रहण देशाच्या पूर्वेकडील भागात दिसणार नाही, कारण त्यावेळी या भागात सूर्यास्त आधीच झालेला असेल. दुपारी 4 नंतर ग्रहण सुरू होईल.

 दिवाळीसारख्या मोठ्या सणावर सूर्यग्रहण झाल्याने अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आहे. उदा. दिवाळीच्या रात्री पूजेनंतर लक्ष्मी पूजा कधी काढावी, ग्रहणाच्या वेळी अन्न सुरक्षित आणि शुद्ध कसे ठेवावे, सुतक काळ केव्हा असेल, ग्रहणाचा सर्व राशींवर कसा परिणाम होईल, गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी असा सल्ला का दिला जातो?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here