औरंगाबाद : शेलगाव गावात ३८ वर्षीय महिला शबाना पटेल यांना रात्रीच्या वेळी घरात घुसुन अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणारे एपीआय कोमल शिंदे व इतर चार पोलीस कर्मचार्यां विरोधात सखोल चौकशी करुन कडक कायदेशिर कारवाई करण्याचे आश्वासन विशेष पोलीस महानिरिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया व अति.पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिले.
संबंधित पोलीसांविरोधात कायदेशिर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मंगळवार रोजी औरंगाबाद ते कन्नड पर्यंत पोलीस अत्याचाराच्या विरोधात काढण्यात येणारे मोर्चास तुर्तास स्थगिती देण्यात आली. मुदतीत सखोल चौकशी करुन दोषी पोलीसांविरोधात कडक कायदेशिर कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती. खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत झालेल्या चर्चे दरम्यान विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधीक्षक व अति. अधीक्षक यांनी सांगितले की, संबंधित स्थानिक पोलीसांनी चुकीची माहिती देवुन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची दिशाभुल केली. तसेच घडलेल्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती लपविली असल्याचे म्हटले.
खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध करत पीडितेचे फोटो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांना पाठवले आहेत. सबब महिलेला रात्रीच्या वेळी घरात घुसुन पुरुष पोलीस बेदम मारहाण करतात हे कृत्य निषेधार्थ व बेकायदेशिर असुन त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणीही केली होती.