TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील औरंगाबादच्या शिक्षकांचे वेतन बंद!

tet-scam-news-updates-tet-passed-76-candidates-certificate-invalid-in-beed-know-details-maharashtra-news-update-today
tet-scam-news-updates-tet-passed-76-candidates-certificate-invalid-in-beed-know-details-maharashtra-news-update-today

औरंगाबाद : राज्यभर (TET Exam Scam 2019) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकार चांगला गाजत आहे. यामध्ये औरंगाबादेतील अनेक विदयार्थ्यांचा समावेश आहे. बोगस प्रमापत्र मिळवून टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली होती. यामध्ये औरंगाबादेतील 120 विद्यार्थ्यांपेक्षा समावेश होता. या विद्यार्थ्यांचे वेतन बंद करण्यात आले.

घोटाळ्यात अडकलेल्या व सरकारी तसेच खासगी शाळेत कार्यरत शिक्षकांची नावे ऑगस्ट महिन्याच्या वेतन देयकातून वगळण्याचे आदेश वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाच्या अधिकक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे यादीत नाव असलेल्या ज्या शिक्षकांचे वेतन सुरू आहे. ते बंद करण्यात आले आहे. औरंगाबादमधील प्राथमिकच्या 120 हून अधिक शिक्षकांचा यात समावेश आहे. ज्यांची ऑगस्टपासूनची वेतन बिलेही सादर न करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिली आहेत.

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने 2019 च्या टीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द तर केलीच. परंतु त्यांना या परीक्षेसाठी कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेऊन अशा एकूण 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांना धक्का बसला. नंतर ही यादी परिषदेने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.

परीक्षेत उमेदवार अपात्र

शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी एका आदेशाद्वारे या यादीतील शालार्थ क्रमांक प्राप्त शिक्षकांचे शालार्थ क्रमांक गोठविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 2019 च्या शिक्षक पात्रता परीक्षेत 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र केले आहे. या यादीतील सर्व उमेदवारांपैकी 576 उमेदवार हे राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये कार्यरत असून, शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान उचलत आहेत. या 576 उमेदवारांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षकांचे वेतन बंद

शिक्षण आयुक्त कार्यालयातून आलेल्या यादीनुसार 120 शिक्षकांचे वेतन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात आणखी वाढ होवू शकते. तसेच यांचे ऑगस्टपासूनचे वेतनबिलही सादर करण्यात येवू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत.

अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here