आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

आपण नक्की जिंकू, ट्विटरद्वारे दिली माहिती

tukaram mundhe nagpur commissioner corona-positive
tukaram mundhe nagpur commissioner corona-positive

नागपूर :  नागपूर महापालिकेचे डॅशींग आयुक्त तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली आहे. (tukaram-mundhe-corona-positive) त्यांनी ट्विटरद्वारे करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मुंढेंनी काय सांगितले ट्विटमध्ये

तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे.

मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू. असं त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here