खुशखबर: २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली!

आरबीआयकडून ७ ऑक्टोबरपर्यंत संधी

rbi-has-extended-the-deadline-for-exchange-of-rs-2000-notes-which-can-now-be-exchanged-till-7-october-2023-news-update-today
rbi-has-extended-the-deadline-for-exchange-of-rs-2000-notes-which-can-now-be-exchanged-till-7-october-2023-news-update-today

मुंबई: तुम्ही आतापर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बदलू शकलेले नसाल तर रिझर्व्ह बँकेने तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं आता २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती

यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंत २००० रुपयांची नोट जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी वेळ दिला होता. रिझर्व्ह बँक ही मुदत वाढवू शकते, अशी अटकळ बांधली जात होती. विशेषत: अनिवासी भारतीयांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पावलामुळे अशा लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, जे काही कारणास्तव बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकले नाहीत किंवा बदलू शकले नाहीत.

 रिझर्व्ह बँकेने दिली ही माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला असून, ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची विद्यमान प्रणाली कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने यंदा १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही २००० रुपयांची नोट कायदेशीर राहतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

२००० ची नोट २०१६ मध्ये आली होती

२००० रुपयांची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये बाजारात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या जागी नव्या पॅटर्नमध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. मात्र, २०१८-१९ पासून RBI ने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली होती. तर २०२१-२२ मध्ये ३८ कोटी २००० रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here