कोल्हापूर : राज्यास देशात कोरोनाचा थैमान सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Shivsena mp sanjay mandlik tested corona positive)
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक व त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही कोरोना बाधित झाले आहेत.
कोल्हापूरात ह्या लोकप्रतिनिधींनाही झाली होती लागण
आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर उपचार सुरु आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.























































































































































