“शेतकऱ्यांसमोर तर इंग्रजांना देखील झुकावं लागलं होतं; लढायचंच असेल तर चीन व पाकिस्तानशी लढा”

विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांचा मोदी सरकारवर निशाणा

in-the-rajya-sabha-ghulam-nabi- opposition leader-aazad-targeted-the-modi-government-farmer-issue
in-the-rajya-sabha-ghulam-nabi- opposition leader-aazad-targeted-the-modi-government-farmer-issue

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात farm laws दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता संसदेतही गाजत आहे. संसदेत शेतकरी आंदोलनावर चर्चेसाठी १५ तासांचा वेळ ठरवण्यात आलेला आहे.

हेही वाचा: शेतक-यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी महेंद्र टिकैत यांचे नाव घेत, मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी देखील सभागृहात उपस्थित होते. आझाद म्हणाले, शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीश सरकारला देखील झुकावं लागलं होतं. जर हे कायदे शेतकऱ्यांना अमान्य असतील, तर ते तत्काळ रद्द केले पाहिजे.

दिल्लीच्या तीन सीमांवर जिथं शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवला जात आहे. असं का केलं जात आहे? सरकारने शेतकऱ्यांचं ऐकायला हवं व त्यांच्यासोबत नाही लढलं पाहिजे. सरकारला लढायचंच असेल तर चीन आणि पाकिस्तानशी लढावं. शेतकऱ्यांशी लढून काहीच मिळणार नाही. असं देखील गुलामनबी आझाद यांनी यावेळी बोलून दाखवलं.

यह भी पढ़ें: किसान आंदोलन का 70वां दिन: “कानून वापसी नहीं, तो घर वापसी नहीं;किसान नेताओंका ऐलान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here