पुणे : जे राज्यसभा आणि विधानपरिषदेवर निवडून येतात, त्यांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये. असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवीकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) लगावला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज बारामती दौ-यावर आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा केली होती.
रवीकांत वरपे यांनी बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल केला. बावनकुळेंना साधे विधानसभेचे तिकीट मिळाले नाही. जनतेतून निवडून येता आले नाही. त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे लागते. ते बारामती जिंकण्याची भाषा करतात, असा बावनकुळेंना टोला लगावला. तर निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनाही वरपेंनी लक्ष्य केले आहे.
‘सीतारामन 2014पासून राज्यसभेत’
निर्मला सीतारामन या 2014पासून राज्यसभेत आहेत. त्या संसदेतील महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असे वरपे म्हणाले. सुप्रिया सुळे या तीनवेळा सलग लोकसभेला निवडून आलेल्या आहेत. निर्मला सीतारामन बारामती फिरायला येणार असतील, तर आम्ही बारामती मतदारसंघात केलेला विकास त्यांना दाखवू. तुम्ही निश्चित याठिकाणी या. तुम्हाला फार काळ राज्यसभेवर राहायचे नसेल तर याठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेला विकासाचा डोंगर पाहा. बारामती लोकसभेचे मॉडेल उभे केले आहे, त्याचे प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे. ते पाहावे. याचा उपयोग तुम्हाला लोकसभेत निवडून येण्यासाठी नक्कीच होईल, असा टोला सीतारामन यांना वरपेंनी लगावला.
‘संसदेतील कामगिरी याविषयी सविस्तर अहवाल माझ्याकडे’
सुप्रियाताईंनी केलेल्या कामाचे पुस्तक माझ्याकडे आहे. संसदेतील कामगिरी याविषयी सविस्तर अहवाल आणि माहिती माझ्याकडे आहे. विकासकामे असतील, रस्ते, जलसंधारण, रेल्वे अशा विविध कामांमध्ये सुप्रियाताई देशात आघाडीवर आहेत. त्यामुळे ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही, त्या बावनकुळे तर ज्या राज्यसभेवर काम करत आहेत त्या निर्मला सीतारामन अशांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असे वरपे म्हणाले.

हेही वाचा : भाजपला पवारांच्या बारामतीत ‘विजयाचा रथ’ रोखणे अशक्य!