
मुंबई l रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना टोला लगावला आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी जय श्रीरामचे नारे दिले. पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही असं संजय राऊत Sanjay Raut यांनी म्हटलं आहे.
चौदा वर्षे वनवास भोगून रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतल्याची आनंदवार्ता हनुमंताने भरताला सांगितली. इतर कुणामुळे आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. अमके तमके मी करीन हा अहंकार फालतू आहे.
तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते असं म्हणत त्यांनी अर्णब प्रकरणावरुनही भाजपाला सुनावलं आहे. आजच्या सामनातील रोखठोक या सदरात लेख लिहून त्यांनी ही टीका केली आहे.
हेही वाचा l बिहारमध्ये जेडीयू-भाजपात मंत्रीपदावरून पेटला वाद; भाजपनेते दिल्लीत
दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असे वाटत होते. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची वगैरे पर्वा न करता खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुदा करोना चिरडून मरेल असा विनोदही काही लोकांनी केला आहे.
कोरोना आहे तसाच आहे. लोकांचे चिरडणे सुरु हे. दिवाळी सण साजरा करावा हे सगळ्यांनाच वाटते. ही परंपरा आहे. रामायण आणि महाभारत यातून अनेक सण-उत्सवांचा उगम झाला. दिवाळी, दसरा उत्सवही त्यातलेच.
हेही वाचा l walnuts Benefits अक्रोड खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात
राम मंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi जय श्रीरामचे नारे दिले. पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही. “
























































































































































[…] […]