खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा’ ‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?: नाना पटोले

"Cancel the tender to purchase 30 lakh metric tonnes of coal from private mines; why buy expensive electricity just to benefit 'friends'?" – Nana Patole

मुंबई:भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात जास्त महागाई महाराष्ट्रात आहे आणि आता वीज दरवाढीचा शॉक देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशासाठी महाजनकोने ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर काढले असून हा कोळसा मोदी-शाह यांच्या मित्रोंच्या खाणीतून घेतला जाणार आहे. हा महागडा कोळसा खरेदी केल्यास वीजेचे दरही वाढतीलत्यामुळे हे टेंडरच रद्द कराअशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले कीआम्ही मागील आठवड्यात कोळशाचा मुद्दा उपस्थित केला होता आता सरकारने आणखी एक टेंडर काढले आहे. ३० लाख मेट्रीक टन कोळशाचे हे टेंडर आहे. आपण WCL कडून चांगल्या प्रतीचा व कमी दरातील कोळसा खरेदी करत होतोहाच कोळसा गुजरात व कर्नाटकला सुद्धा जातो पण पंतप्रधानांच्या मित्रोंला फायदा पोहचवण्यासाठी हे टेंडर काढले आहे. टेंडरमध्ये स्पर्धा असेल तर कमी दरात कोळसा खरेदी करता येतो व त्याचा फायदा जनतेला होतोपण आता ही स्पर्धाच ठेवली नसून थेट खास व्यक्तीच्या खाणीतून हा कोळसा खरेदी केला जाणार आहे. स्पर्धा संपल्याने महागडा व कमी दर्जाचा कोळसा घ्यावा लागणार आहे. कोल वॅाशरीकडे ५ लाख मेट्रीक टन कोळसा पडून आहेतो कोळसा सरकार का घेत नाही. सरकार महाग व कमी दर्जाचा कोळसा खरेदी करणार व नंतर वीजेचे दर वाढणारही जनतेची लूट आहे. ती थांबली पाहिजे यासाठी हे टेंडर रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ३३ मोठे उद्योग बाहेर गेले आहेतत्याला कारण महाराष्ट्रातील महागडी वीज आहे. गुजरात व कर्नाटकात आपल्यापेक्षा कमी वीज दर आहेत. उद्योग राज्याबाहेर गेल्याने त्याचा फकटा आपल्याला बसतोबेरोजगारीत वाढ झाली आहेअसेही नाना पटोले यांनी सांगितले.

पंतप्रधानांकडून GDP चे खोटे आकडे..

देशाचा GDP ७.८ टक्के असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक VDO सोशल मीडीयावर टाकून केला आहे. पण पंतप्रधानांनी सांगितलेला GDP चा दर खोटा असल्याचे या विषयातील तज्ञच सांगत आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहेबेरोजगारी वाढलेली आहेशेती संकटात आहे मग GDP वाढला कसाअसा प्रश्न उपस्थित करत खोटे आकडे सांगून पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केली आहेअसे नाना पटोले म्हणाले..

भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर देश वाचेल, संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा: हर्षवर्धन सपकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here