बस- ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ प्रवासी ठार,४ जण गंभीर

Andhra-pradesh-13-people-killed-4-injured-in-a-collision-between-a-bus-and-a-truck-near-madarpur-in-veldurti-mandal-kurnool-district
Andhra-pradesh-13-people-killed-4-injured-in-a-collision-between-a-bus-and-a-truck-near-madarpur-in-veldurti-mandal-kurnool-district

करनूल : आंध्रप्रदेशातील करनूल Andhra-pradesh kurnool येथे रविवारी एक भीषण अपघात Bus-truck accident झाला आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. चित्तूर जिल्ह्यातून काही नागरिक मिनी बसने हैदराबादच्या दिशेने जात होते त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एक लहान मुलगा आणि आठ महिलांचा समावेश आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व नागरिक राजस्थानमधील अजमेर येथे जात होते.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी डिवायडरला धडकली त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या एका ट्रकला जाऊन धडकली. करनूल येथील मादरपूर गावात झालेल्या या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: ‘या’ कारणामुळे गुन्हा नोंद नाही

मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक! ‘या’ वेळेत धावतील लोकल ट्रेन

Farmers Protest: गर्मी हो या बरसात आंदोलन रहेगा जारी – राकेश टिकैत

शुगर को कम करने के लिए जरूर अपनाएं ये टिप्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here