रत्नागिरी l कोरोना काळात एसटीचा संचित तोटा वाढला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 हजार कोटींचं पॅकेज दिलं. परंतु एसटीच्या खासगीकरणाबाबत कोणताही विचार नाही. 6 महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं असं परिवहन मंत्री अनिल परब Anil parab यांनी सांगितलं.
परिवहन मंत्री अनिल परब Anil parab म्हणाले, एसटीचे डिझेलचे पंप जनतेसाठी खुले करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 30 पंप सुरु करण्यात येतील, आगामी सहा महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं दिसेल.
एसटीच्या गाड्या रिकाम्या धावतात.एसटीला तोटा होतो. मात्र, बसेस रिकाम्या धावू नये म्हणून अॅक्शन प्लॅन करण्यात येत आहे. एसटीचं खासगीकरण करण्याचा कोणताही आमचा विचार नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा l Bihar Result l ”जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
परिवहन मंत्री अनिल परब Anil parab म्हणाले, एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न आहेत. कोरोनामुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यामध्ये कोरोनामुळे अडचणी आल्या. एसटी आणि इतर क्षेत्रातील वाहनांच्या टायर रिमोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एसटी गाड्यांचं मालवाहतूक करण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र शासनाचा मालवाहतुकीचा व्यवसाय एसटीकडे वर्ग करण्यात येणार आहे. एसटी स्वत:च्या वाहनांची बांधणी करतात असं अनिल परब म्हणाले.
हेही वाचा l अर्णब गोस्वामींसह दोन आरोपींना अखेर जामीन मंजूर
रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सुरुवातीला आत्महत्या केली असं म्हटलं गेले त्यानंतर हत्या केली गेली, असा आरोप करण्यात आला, असं अनिल परब म्हणाले.








































































































































